
बुलढाणा जिल्ह्यात आज प्राप्त 5 रिपोर्ट पैकी 4 रिपोर्ट निगेटिव्ह असून एक रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. आतापर्यंत 625 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25 रुग्ण कोरोनाबधित सापडले आहेत. त्यापैकी एक मृत आहे. तसेच आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे. सध्या रूग्णालयात एक कोरोनाच्या रूग्णावर उपचार सुरू आहे.
आज पॉझिटिव्ह आलेला पुरुष हा 45 वर्षीय असून जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून रुग्णाच्या घराजवळील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. सदर क्षेत्र पूर्णपणे सिल करण्यात आले आहे.



























































