सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वादळ आणि अवकाळी पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वादळ झाले. तसेच जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडला. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व काही ठिकाणी पाऊस पडल्याने उष्णतेने हैरान झालेल्या जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट आली होती. एकीकडे कडक ऊन व दुसरीकडे तापमानाचा चढलेला पारा यामुळे जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. त्यामुळे मंगळवारी पडलेल्या पावसाने व गारगार सुटलेल्या जोराच्या वाऱ्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला. यावेळी वाऱ्याचा वेग मोठा असल्याने काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. तर काही व्यक्तींच्या घरांचे पत्रे या वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. सुमारे 10 ते 15 मिनिटे झालेल्या या वादळी वाऱ्यात जिल्ह्याच्या सर्वच ठिकाणी पाऊस पडलेला नाही. मात्र, वादळ बहुतांश भागात झाले. दरम्यान, सिंधुदुर्गनगरीतही जोरदार वादळ झाले असून यामुळे सिंधुदुर्गनगरी परिसरातील काही ठिकाणी झाडे पडली आहेत. तर अनेकांचे पत्रे उडून गेले आहेत. येथे पाऊस पडलेला नाही.