
केज तालुक्यातील मांगवडगाव परिसरात शेत जमिनीच्या भांडणातून तीन व्यक्तींचा निर्घृण खून करण्यात आला आहे. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी निंबाळकर कुटुंबातील पंधरा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आले आहे. या व्यक्ती पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटार सायकली सुद्धा जाळून टाकण्यात आल्या होत्या. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हे ट्रॅक्टरने आले होते व त्यांनी पाठलाग करून हल्ला केला. हल्लेखोर हे तीस ते चाळीसजण असल्याची माहिती असून त्या पैकी पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आले. बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पुढील तपास केज व युसुफवडगाव पोलीस करत आहेत.
निंबाळकर आणि पवार यांचा गेल्या 20 वर्षापासून जमिनीचा वाद कोर्टामधे चालू आहे. पन 20 वर्षापूर्वी निंबाळकर व पवार यांच्यात भांडण होऊन निंबाळकर यांच्यातल्या एका व्यक्तीची हत्या झाली होती. यामध्ये मृत व्यक्तीचे प्रेतही मिळाले नव्हते. त्यामध्ये आज ज्यांची हत्या झाली त्यांच्यावर 302 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. नंतर पुराव्या अभावी आरोपी निर्दोष मूक्त झाले होते. त्यांनतर ते गाव सोडून निघून गेले व जमिनीच्या कोर्ट कचेरी चालू होत्या. जमिनीचा निकाल पवार यांच्या बाजूने लागला व निबांळकर यांच्या ताब्यात असलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी पवार पोहोचले. काल रात्री ट्रॅक्टर घेऊन नांगरण्यासाठी जमिनीमधे गेले. यावेळी हाणामारी झाली होती, अशी माहिती कळते आहे.






















































