
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या 77 झाली आहे. नव्याने सापडलेल्या तीन रूग्णांमध्ये एक रत्नागिरी नर्सिंग सेंटर आणि दोन संगमेश्वर तालुक्यातील आहेत.
मिरज येथून गुरुवारी उशिरा रात्री 74 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांत पैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत.संगमेश्वर तालुक्यात देवळे आणि भडकंबा येथे एक रूग्ण सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी मिरज येथून आलेल्या अहवालानं पैकी 143 अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत यामध्ये 39 अहवाल कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील असून उर्वरित सर्व अहवाल रत्नागिरीमधील होते.



























































