गेवराई पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मातोरी, खामगाव व महारटाकळी येथे तीन चेक पोस्ट सध्या कार्यान्वीत आहे. या चेक पोस्ट मध्ये गेवराई व चकलांबा पोलिस ठाण्यातील आधिकारी व कर्मचारी काम करत आहे. मागिल काही दिवसापासून या चेक पोस्ट वरून बाहेर जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी विनापास येथील पोलिस कर्मचारी पैसे घेऊन सोडवित आसल्याची माहिती पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना कळाली. त्या अनुषंगाने अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांनी सापळा रचून एक पर्याय काढला. तो म्हणजे खाजगी व डमी प्रवाशी तयार केले व गेवराई तालुक्यातील खामगाव चेक पोस्टवर बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी पाठविले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. खामगाव येथील चेक पोस्टवर डमी प्रवाशांनी जालना व संभाजीनगर येथे जाण्यासाठी पोलिसांना केली. मात्र पोलिसांनी प्रथमता जाऊ दिले नाही. याच डमी प्रवाशांनी साहेब तडजोड करा व आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी केली. त्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये द्या आम्ही जाऊ देतो असे चेक पोस्टवरिल पोलिसांनी तडजोड करुन सांगितले. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना चेक पोस्टवरून पुढील जिल्ह्यात जाण्यासाठी सोडले.याच वेळी विजय कबाडे यांच्या पथकाने गेवराई पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एम.के.बहिरवाळ,डी.बी.गुरसाळे व एस.बी.उगले यांना पकडून पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे अहवाल दिला.हर्ष पोद्दार यांनी या तीन कर्मचारी यांना शनिवारी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.