
कोरोना मुक्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात बाहेरून आलेले प्रवासी कोरोना लागण झालेले असल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसात 9 कोरोना बाधित सापडल्याने जिल्हावासीयांनी चिंता वाढलेली असताना आज तब्बल 62 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले.
काल नगर जिल्ह्यातील सात जण बीड जिल्हा सुरक्षित असल्याने आष्टी तालुक्यातील सांगवी येथे आले या सात ही जणांची तपासणी केली असता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सूर असताना 65 वर्षीय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. दरम्यान आज नवीन 62 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या मध्ये गेवराई -8, माजलगाव – 42, बीड – 11, परळी – 1 असे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे
































































