बुलढाण्यात सहा जणांचे कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यात आज प्राप्त सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले आतापर्यंत 748 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात काल जळगाव जामोद येथील 72 वर्षीय मृत वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 30 कोरोनाबधित रूग्ण आहेत. तसेच खामगांव येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे.  सध्या रूग्णालयात 4 रुग्णांवर उपचार सुरू आहे.  तसेच आज 19 मे रोजी 6 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 6 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 117 आहेत.  आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 748 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.