अमरावतीमध्ये आढळले कोरोनाचे 18 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 133 वर  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती शहरात एकाच दिवशी कोरोनाचे 18 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 133 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकाच दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मिळालेल्या अहवालानुसार मसानगंज येथे 6, पाटीपुरा येथे 2 तर शिवनगर येथील 2 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. यासोबतच चेतनदास बगीचा, प्रबुद्ध विहार, पार्वती नगर, सिंधु नगर, रहमत नगर, नांदगाव पेठ, बेलपुरा व पॉरीडॉईज कॉलनी येथे प्रत्येकी 1 रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे.  उल्लेखनीय म्हणजे अमरावती शहर वगळता ग्रामीण भागात कोरोनाची अल्पप्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. नांदगाव पेठ व वरुड वगळता इतर तालुक्यात कोरोना रुग्ण नगण्य स्वरुपात आहे. अमरावतीत आतापर्यंत 133 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 62 रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत.