
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे हातभट्टी दारूच्या अड्यावर जालन्याच्या दारूबंदी पथकाने धाड टाकली आहे. या धाडीत 43 हजार रुपयांची दारु साठ्यासह मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील एक इसम गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीहोती. या माहितीवरुन पोलीसांनी धाड टाकल्यानंतर त्याठिकाणी पाहणी केली असता पाणी भरण्याच्या जार व कॅन, प्लास्टिकच्या बाटलीत गावठी दारू साठवलेली होती. हा माल पोलीसांनी हस्तगत करुन तब्बल 43 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.



























































