पाटोदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत बुधवारी चार रुग्णांची भर पडली, यातील तीन रुग्ण पाटोदा तालुक्यातील आहेत.

गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून बुधवारी तालुक्यातील वाहाली चिखली येथील दोन आणि पाटोदा शहरातील एक अशा तीन नव्या रुग्णांची भर पडली. पाटोदा – 1 (वय 73 पुरुष) वाहाली चिखली – 2 (60व 27) हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले आहेत.

बीड जिल्ह्यातून बुधवारी एकूण 114 स्वाब पाठवले होते त्यातील 100 स्वाबचे अहवाल आले असून 13 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.