योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्सअॅपवर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, असं लिहिलं होतं. त्यानंतर एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करून पुढे योगी त्यांचे कट्टर शत्रु असल्याचं म्हटलं होतं. हा मेसेज आल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली.

हा मेसेज एका मोबाईल क्रमांकावरून आल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संबंधित मोबाईल नंबरचे तपशील शोधायला सुरुवात केली आहे. तसंच त्या क्रमांकाच्या आधारावरच तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपशील कळल्यानंतर पुढील कारवाई तातडीने करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.