नगर जिल्ह्यात 6 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, एकूण आकडा 183 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात आज गुरुवारी 6 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नवीन सापडलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्याचा आकडा 183 वर गेला आहे.

गुरुवारी शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील 32 वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला. यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील 10 वर्षीय मुलगा कोरोना बाधित तर लालबाग येथून घुलेवाडी (पारनेर) येथे आलेली 28 वर्षीय महिलाही कोरोना बाधित आढळली. यासह संगमनेर शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हेवाडी रोड येथील 18 वर्षीय युवक आणि नवघर गल्ली येथील 32 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाली, तर नगर शहरातील लालानगर, नेप्तीनाका केडगाव येथील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

‘मिशन बिगिन अगेन’बाबत जारी केलेल्या नियमात बदल, ‘या’ गोष्टी होणार सुरू, ‘या’ वर बंदी कायम

आत्तापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 183 झाली आहे. जिल्ह्यात सध्या ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या 83 आहे, तर 90 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

चांगली बातमी – कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या ‘अँटिबॉडी’ पासून औषध तयार करण्यात यश