
ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर पडणे सोपे नाही. प्रेमाचं नातं जेव्हा अचानक संपत तेव्हा स्वतःला सांभाळणे कठीण होऊन जात. लॉकडाऊनमध्ये ब्रेकअप झालेल्यांसाठी हे विशेषत: त्रासदायक आहे. अशा वेळी घरात बसून पुन्हा पुन्हा जुन्या गोष्टींकडे लक्ष जाऊन सारख्या त्याच गोष्टींची आठवण येऊ शकते. सामान्यत: ब्रेकअप झाल्यानंतर अनेक लोक स्वतःला कामात गुंतवून घेतात. मित्रांना भेटतात. त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवतात. मात्र लॉकडाऊनमध्ये हे सर्व करणं अवघड आहे. अशात ब्रेकअपच्या वेदनेपासून स्वतःला सावरणे कठीण आहे. मात्र अशा परिस्थितीही तुम्हाला स्वतःला सांभाळावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला ब्रेकपच्या या वेदनेतून बाहेर पडण्यात मदत करू शकतील.
ऑनलाईन मोटिव्हेशन चित्रपट पाहा
लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येत नाही, मग काय करावे? भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी पहिला प्रयत्न तुम्हाला स्वत: लाच करावा लागणार आहे. मोटिव्हेशन चित्रपटांची यादी बनवा आणि ऑनलाइन पाहा. जुन्या गोष्टीकडून जितक्या लवकर तुम्ही आपलं लक्ष दुसरी कडे वळवाल तितक्या लवकर तुम्ही या वेदनेतून बाहेर पडाल.
मित्रांशी फोनवर बोला
लॉकडाऊनमध्ये मित्रांना भेटतात येत नसेल. मात्र अशावेळी तुम्ही मित्रांशी फोनवर बोलू शकता. व्हिडीओ चाट करून हृदयाचे ओझे हलके करा. मित्रांना आपल्या वेदना सांगा. मात्र एकाच गोष्टीचा उल्लेख वारंवार करणे टाळा. जितकं होऊ शकेल तितकं आजची परिस्थिती, देश, जगाबद्दल बोला किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या विषयी बोला.
चांगली पुस्तके वाचा
जास्तीत जास्त चांगली पुस्तके वाचा आणि वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपले ज्ञान वाढवा. आपण नवीन गोष्टींमध्ये जितका जास्त रस घ्याल तितक्या लवकर आपण जुन्या गोष्टींमधून बाहेर पडाल. चांगली आणि प्रेरणादायक पुस्तके वाचून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.
ऑनलाइन डेटिंग
असे अनेक अॅप्स आहेत जी ऑनलाइन डेटिंगसाठी सर्वात विश्वासार्ह मानली जातात. जुन्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी या अॅप्सवर नवीन जोडीदाराचा शोध घेतला जाऊ शकतो. लॉकडाउनसाठी या डेटिंग अॅप्समध्ये बर्याच नवीन व्यवस्था देखील केल्या गेल्या आहेत, ज्याचा आपण फायदा घेऊ शकता.

























































