शिरुरमध्ये भारतीय स्टेट बँकेला आग, लाखो रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरातील अबंरशेठ डुंगरवाल यांच्या मोढ्याच्या शेजारील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये शनिवारी आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपंयाचे नुकसान झाले असून बँकेतील रोजच्या वापरातील कॉम्प्युटर संचासह महत्त्वाचे साहित्य व दैनंदिन व्यवहारातील  साहित्य आगीमध्ये जळून राख झालेले आहेत.

शनिवारी  मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जवळपास अचानक शॉटसर्कीट झाले होते. त्यामध्ये आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे या आगीच्या जाळामध्ये दोन कॅश काऊन्टर, दोन प्रिटंर, तीन कॉम्प्युटर संच, दोन कॅश काऊन्टींग मशीन,एअर कंडिशनर, सहा ते सात सी,सी.टी.व्ही. कॅमेरे असे सर्व मिळून जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.