
कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कश्मीरच्या शोपियां भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. उडालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातला आहे.
मृत दहशतवाद्यांमध्ये हिजबुल कमांडर फारूक अहमद भट उर्फ नालीचा समावेश होता. नाली हा सैन्याच्या हिटलिस्टवर होता. दोन आठवड्यांपूर्वी एका चकमीत नाली वाचला होता. दहशतवादी नवीद बाबू याला अटक केल्यानंतर संघटनेने नालीवर दक्षिण कश्मीरची जवाबदारी दिली होती. आता सुरक्षा दलाने त्याचाही खात्मा केला आहे.
सुरक्षा दलाने अजूनही दहशतवाद्यांची नावे जाहीर केलेली नाही. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाली सह अहमद वागेरा, अमीन नायक या दहशतवाद्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्याकडून एके 47 आणि पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. त्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवले जाणार नसल्याचे सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे.



























































