
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि शिवसेना शाखा क्र. 1 च्या सहकार्याने बोरिवली येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय रक्तदान शिबिरात 650 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख दामोदर म्हात्रे व सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, सुनील पाटील, उत्तम बारबोले, अतुल तावडे, शाखा संघटक जयश्री बंगेरा, अश्विनी जठार यांनी सहकार्य केले. शिबिरास विभाग संघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, बाळकृष्ण ढमाले यांनी भेट देऊन रक्तदात्यांना सन्मानित केले.
































































