
बजाज ऑटोने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन BS6 Pulsar 125 Neon लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक स्प्लिट सीट आणि स्प्लिट ग्रॅब-रेलच्या स्वरूपात अपडेट केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच बाईकच्या किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत.
BS6 Pulsar 125 मध्ये इंधन इंजेक्टेड 124.4 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे 8,500 rpm वर 11.8 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 11 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह आहे. कंपनीने यात एक काउंटर बॅलन्सही दिला आहे. यासह कंपनीने यात प्रायमरी किक फिचर दिले आहे. ज्यामध्ये स्वार कोणत्याही गिअरमध्ये किक मारून बाईक सुरू करू शकतो. या बाईकचे वजन 140 किलो आहे.
किंमत
BS6 Pulsar 125 याच्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 69,997 रुपये इतकी आहे. तसेच याच्या डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 74,118 रुपये आहे.




























































