
गेल्या चार महिन्यात पाच जणांचा बळी घेणारा हल्लेखोर वाघ अखेर आज जाळ्यात अडकला. दोनच दिवसांपूर्वी या वाघाला पकडण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यात आज यश आलं.
ताडोबाच्या कोलारा बफर आणि कोर क्षेत्रात वास्तव्य असलेल्या वाघाला पकडण्याची जोरदार मागणी लोकांनी केली होती. आज तो पकडला गेला असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार के दरात आणलं जाणार असल्याची माहिती आहे.































































