
हिंदुस्थान आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात पीओकेमध्ये गरळ ओकणारा पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. आफ्रिदीने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच यातून लवकर बरा होण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करा असे आवाहन आफ्रिदीने चाहत्यांना केले आहे.
आफ्रिदीने ‘एसए फाउंडेशन’ या आपल्या एनजीओमार्फत पाकिस्तानात चॅनेल गरजवंत नागरिकांना मदत केली. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. याबाबत त्याने ट्विटरवर माहिती दिली.
‘मला गुरुवारपासून बरे वाटत नसून शरीरात वेदनाही होत आहेत. यादरम्यान मी कोरोना चाचणी केली आणि दुर्भाग्याने माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लवकरच पूर्ण बरा होण्यासाठी मला तुमच्या प्रार्थनाची गरज आहे’, असे ट्विट आफ्रिदीने केले आहे.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1271720209657630720?s=19
वादग्रस्त विधान
आफ्रिदी गेल्याकाही दिवसांपासून हिंदुस्थानी युजर्सच्या निशाण्यावर आहे. गेल्या महिन्यात त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पीओकेमध्ये गरजवंतांना अत्यावश्यक वस्तू वाटप करताना त्याने हिंदुस्थान आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात गरळ ओकली होती. मोदी कोरोनापेक्षा खतरनाक रोग असल्याचे वादग्रस्त विधान आफ्रिदीने केले होते. यामुळे हिंदुस्थानचे माजी खेळाडू भडकले आणि हरभजन, युवराज आणि गंभीरने त्याला चांगलेच सुनावले होते.

























































