
मध्य रेल्वेने आपल्या सर्वात मोठ्या सीएसएमटी आणि एलटीटी टर्मिनसवर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यापूर्वी त्यांची विमानतळाच्या धर्तीवर ‘इन्फ्रारेड’ कॅमेर्यांनी ‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांनी ग्रुपने जरी प्रवेश केला तरी त्यांच्यात ज्याच्या शरीराचे तापमान जास्त आहे, नेमके त्यालाच शोधून काढण्याचे तंत्र या ‘आर्टीफिशिल इंटेलिजन्स’ तंत्राच्या कॅमेर्यांमध्ये आहे.
मध्य रेल्वेने अलिकडेच स्वयंचलित तिकीट चेकींग आणि मास्क तपासणारी ऑटोमेटेड अॅण्ड टिकीट चेकींग अॅण्ड मॅनेजिंग अॅक्सेस ‘आत्म’ यंत्रणा बसविली होती. तसेच कालच पुणे डिव्हीजनमध्ये ‘कॅप्टन अर्जून’ नावाची रोबोटिक यंत्रणा बसविली आहे. आता याच मालिकेत प्रवाशांचे बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी मध्य रेल्वेने इन्फ्रारेड कॅमेर्यांची सहाय्य घेण्याचे ठरविले आहे. या थर्मल कॅमेर्यांतील सेंसर उष्णतेच्या दिशेने अलर्ट करण्याचे काम करते.
मोठ्या संख्येने जरी प्रवासी आले तरी गर्दीतील ज्या प्रवाशाच्या शरीराचे तापमान 38 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त आहे. नेमके त्याला ओळखून काढत कॅमेर्यावर लगेच अलार्म वाजवत नियंत्रण कक्षातील सुरक्षा कर्मचार्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
या इन्फ्रारेड थर्मल कॅमेर्यांचे वैशिष्ट्ये
– कपाळाचे तापमान मोजणार
– सोशल डिस्टन्सिंगचे मॉनिटरींग
– प्रवाशाच्या संपर्कात न येता तपासणी
– थर्मल आणि व्हीजन असे दुहेरी कॅमेरे
– 0.3 सेल्सियस अचूकता
























































