
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध नेता सुशांत सिंह रजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. नंतर रुपेरी पडद्यावरही नाव गाजवले होते.
किस देश मे है दिल मेरा या स्टार प्लसवरील मालिकेतून सुशांतने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. पण त्याला खरी ओळख एका मराठी व्यक्तिरेखेमुळे मिळाली होती. 2009 साली झी टीव्हीवर आलेल्या पवित्र रिश्तामध्ये त्याने मानव देशमुख ही व्यक्तिरेखा निभावली होती. त्यामुळे सुशांत घरोघरी पोहोचला होता. सुशांतने जरा नचके दिखा, झलक दिखला जा या रिऍलिटी शोमध्येही काम केले होते.
2011 साली काय पो छे या सिनेमातून सुशांतने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने इशांत भटच्ची भुमिका बजावली होती. सुशांतचा पहिलाच चित्रपट हिट झाला होता आणि त्याच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली होती. त्यानंतर सुशांतने शुद्ध देसी, रोमान्स, पीके सारखे हिट सिनेमेही दिले. मोठ्या स्क्रीनवर त्याने धोनीची भुमिका बजावली होती. एम एस धोनी या चित्रपटामुळे धोनी प्रसिद्धिच्या शिखरावर होता. त्यानंतर राबता केदारनाथ हे सिनेमे फार चालले नाही. सोनचिडिया या चित्रपटाला जरी यश मिळाले नाही तरी सुशांतच्य अभिनयाची प्रशंसा झाली होती. छिछोरे आणि ड्राईव्ह या सिनेमांनाही फार यश मिळाले नाही. सुशांत सिंहचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा ठरला. हा चित्रपट आधी नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होणार होता. परत तो मे मध्ये ढकलण्यात आला. कोरोना संकटामुळे परत त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
सुशांतच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या पूर्वी अभिनेता इरफान खानचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ऋषी कपूर यांचाही मृत्यू झाला होता.



























































