कोपरगाव तालुका कोरोनामुक्त,  शेवटच्या कोरोनाबाधित तरूणीला डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत चहुबाजूने हॉटस्पॉट तालुक्यांनी घेरलेला असतानाही ग्रीनझोन ठरलेला नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका 15 दिवसापुर्वी अवागमनामुळे  कोरोनाबाधित झाला होता. पहिल्या महिला डॉक्टर  रूग्णाला राहाता तालुक्यातील व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होती.  आठ दिवसानंतर शुक्रवारी रोजी सदर महिला डॉक्टर कोरोना मुक्त होऊन घरी परतल्या. 6 जुन रोजी दुसरा रुग्ण वडील पॉझिटिव्ह असतानाही आजोबा बरोबर ठाणे येथून  आलेली एक 14 वर्षाची तरुणी  पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.  सोमवारी त्या तरुणीचा अहवालही  निगेटिव्ह आला. ती तरुणी ही आता बरी झाली आहे.  त्यामुळे पहिल्या टप्प्यातील दोघेही कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे.

तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे स्थानिक प्रशासन, पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर पोलीस निरीक्षक अनिल कटके व वैद्यकीय पथकाने केलेल्या परिश्रमामुळे दुसरा कोरोना बाधित रूग्ण अपेक्षेप्रमाणे शेवटच्या अहवालातही निगेटीव्ह आला. आतापर्यंत दोघांना ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे. घरी जाईल अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे डॉ वैशाली बडदे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ  कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.