कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार सकाळपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याने दिलासा असतानाच सोमवारी रात्री 1 आणि मंगळवारी सकाळी 5 असे पाच नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 725 झाली आहे. तर 13 जणांना घरी सोडण्यात आल्याने, आतापर्यंत एकूण 644 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सीपीआरमध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळाली. सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 134 प्राप्त अहवालापैकी 130 अहवाल निगेटिव्ह तर आजरा-1 आणि गडहिंग्लज-3 असे 4 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 180 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. (शाहुवाडी तालुक्यातील 180 पैकी एकाचा दुसराही अहवाल पॉझिटिव्ह) असा समावेश आहे. याशिवाय आजरा-75, भुदरगड-71, चंदगड-75, गडहिंग्लज-84, गगनबावडा-6, हातकणंगले-10, कागल-57, करवीर-21, पन्हाळा-27, राधानगरी-66, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र-11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 717 आणि पुणे-1, सोलापूर -3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 725 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.





























































