हिंदुस्थानी संस्कृतीची महती जगाला समजतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<दीपाली देशपांडे , प्रशिक्षिका, सिनिअर नेमबाजी संघ>>

कोरोनामुळे सर्कांचेच नुकसान होत आहे. मात्र या किषाणूमुळे हिंदुस्थानी संस्कृतीची महती सर्कांचाच पुन्हा एकदा समजली आहे. हात स्कच्छ धुणे, नमस्कार करणे यांसारख्या हिंदुस्थानी संस्कृतीचा अवलंब आपण आपल्या घरापासूनच करायला हवा.

नेमबाजीचा वर्ल्ड कप नवी दिल्लीत होणार होता, पण कोरोना वाढू लागल्यानंतर ती स्पर्धा झाली नाही. मात्र ऑलिम्पिकसाठीच्या सिलेक्शनसाठी आम्हाला काही काळ नवी दिल्लीत राहावे लागले. 20 मार्चला महत्वाची बैठक होती. मात्र कोरोनामुळे ती बैठक रद्द करण्यात आल्याचे 19 मार्चला कळवण्यात आले. त्यामुळे 20 मार्चला मुंबईत दाखल झाले. त्यानंतर लॉकडाऊनला सुरुवात झाली. योग्य वेळी घरी आल्याचे समाधान मिळाले.

लॉकडाऊनमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळाला. 1988 सालापासून खेळाडू म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. तसेच 2012 सालापासून प्रशिक्षक म्हणून हिंदुस्थानी संघाशी जोडले आहे. तिथपासून इतका वेळ कधीही मिळाला नव्हता. त्यामुळे याचा सदुपयोग केला. आमच्या सासूबाई सुगरण आहेत. त्यामुळे जेवणाचे काहीही टेन्शन नसते. तरीही सर्व घरी असल्यामुळे यंदा मीही काही पदार्थ बनवले. केक, पिझ्झा, पास्ता, मेक्सिकन राईस, भेळपुरी यांसारख्या पदार्थांकर ताव मारला.

सकाळच्या सत्रात सरावावरही जोर दिला. आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर नित्यनियमाने सराव करायची. फिटनेसवर लक्ष द्यायची. आम्ही जिथे राहतो तिथे कडक बंधने नव्हती. पण मला नियम मोडायला आवडत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मी कुठेही बाहेर गेले नाही. सरकारचे नियम काटेकोरपणे पाळले.

नेटफ्लिक्स मी मोबाईलमध्ये डाऊनलोड केले, पण त्यावर अद्याप काहीही बघितले नाही. मी टीव्हीही जास्त बघत नाही. पिक्चरही बघितले नाही, पण बातम्या वाचायला आवडतात. पुस्तके वाचायला आवडतात. ड्रॉइंग करायला आवडते. या लॉकडाऊनमध्ये ड्रॉइंग मनसोक्त केली.

सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल

येत्या  काळात  नेमबाजीचा खेळ सुरू झाल्यास थोडी काळजी घ्यावी लागेल. हात धुणे, सॅनिटाइज करणे यांसारख्या बाबींवर लक्ष द्यावे लागणार आहे; पण सध्या तरी सर्व काही अनिश्चित आहे. कोरोनानंतर सर्वात शेवटी जी गोष्ट सुरू होईल ती क्रीडा असणार आहे.

नेमबाजीमध्ये जास्त बदल होईल असे वाटत नाही

कोरोनामुळे क्रीडाक्षेत्रावर परिणाम होईल, पण नेमबाजीमध्ये जास्त फरक पडेल असे वाटत नाही. कारण हा खेळ वैयक्तिकरीत्या खेळला जातो. दोन शूटर्समध्ये नियमाप्रमाणे अंतरही असते. तसेच हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकही येत नाहीत. त्यामुळे या खेळामध्ये तसा काही मोठा बदल होईल असे वाटत नाही.