बहादुर जवानांनी चीनचा प्रयत्न हाणून पाडला; पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर ‘पीएमओ’कडून स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, विरोधकांकडून प्रश्न उपस्थितीत होत आहेत. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ (एलएसी) चीनने बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हिंदुस्थानच्या बहादुर जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला, असे ‘पीएमओ’ने म्हटले आहे.

20 प्रमुख पक्षांबरोबर शुक्रवारी बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमा रेषेचे उल्लंघन करून कोणीही घुसखोरी केलेली नाही किंवा आपली चौकी ताब्यात घेतलेली नाही, असे वक्तव्य केले होते. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रश्न उपस्थितीत केले. आपले 20 जवान कुठे शहीद झाले? असा सवाल त्यांनी केले. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही चीनने घुसखोरी केली नव्हती, तर हिंसक संघर्ष का झाला. कमांडर पातळीवर चर्चा कोणत्या मुद्दय़ावर झाली, असे प्रश्न विचारले होते. यावर अखेर ‘पीएमओ’ने खुलासा केला आहे.

काय आहे ‘पीएमओ’चा खुलासा

  • देशाच्या अखंडतेसाठी हिंदुस्थानचे जवान सदैव तत्पर आहेत. मात्र, काही लोक पंतप्रधानांच्या वक्तव्याचा विपर्यास करून वाद निर्माण करीत आहे.
  • पंतप्रधान मोदी यांनी केलेले सर्वपक्षीय बैठकीतील वक्तव्य गलवान खोऱयात 15 जून रोजी झालेल्या घटनेवर होते. ‘एलएसी’जवळ चिनी सैन्य पूर्कीपेक्षा अधिक संख्येने आले. 15 जून रोजी त्यांनी ‘एलएसी’जवळ बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. हे काम न रोखल्यामुळे संघर्ष उफाळून आला. 16 बिहार रेजिमेंटच्या जकानांनी पराक्रम दाखकत चीनचा प्रयत्न हाणून पाडला. जकानांच्या पराक्रमामुळेच आज सीमेजकळ चिनी सैन्य नाही.
  • ज्यांनी आमच्या भूमीकर कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्यांना हिंदुस्थानच्या कीर जकानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानचे सैन्य सीमेचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे.
  • ‘एलएसी’वर हिंदुस्थान एकांगी बदल होऊ देणार नाही. सीमेकर बदल करण्याच्या प्रयत्नांना हिंदुस्थानकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. अशा आक्हानांचा लष्कर पूर्कीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सामना करत आहे, असे पीएमओने म्हटले आहे.