India china faceoff सरकारचा मोठा निर्णय, हत्यारांच्या खरेदीसाठी लष्कराला दिला एमर्जन्सी फंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही सैन्यदलांना चीनच्या घुसखोरीविरोधात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार दिल्यानंतर आता केंद्र सरकारने याला अधिक मजबुती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चीनसोबत एलएसीवर सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत केंद्र सरकारने लष्कर, वायुदल आणि नौदलाला 500 कोटी रुपयांचा एमर्जन्सी फंड उपलब्ध करून दिला आहे. याचा वापर मोक्याच्या क्षणी खतरनाक हत्यारांच्या खरेदीसाठी केला जाणार आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना आवश्यक हत्यारांच्या खरेदीसाठी फास्ट ट्रॅक प्रोसेसअंतर्गत 500 कोटी रुपयांचा एमर्जन्सी फंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात चीनने मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत. चीनला उत्तर देण्यासाठी तिन्ही सैन्यदलाला कोणत्याही प्रकारच्या हत्यारांचा तुटवडा पडू नये यासाठी सरकारने फंड दिला आहे.

याआधी उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर आणि बालकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवेळी सरकारने लष्कराला हत्यारांच्या खरेदीसाठी फंड दिला होता. एअरफोर्सला याचा चांगलाच फायदा झाला होता. याद्वारे स्पाईस 200 एअर तू ग्राउंड मिसाईल, स्ट्रम अटाका एयर टू ग्राउंड मिसाईलसह अनेक हत्यारांची खरेदी करण्यात आली होती.