
30 जून पर्यंत आधार कार्डशी आपला कायमस्वरूपी पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) लिंक न केल्यास आपले पॅनकार्ड पुढील महिन्यापासून अवैध मानले जाईल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पॅनकार्डाचा वापर करता येणार नाही. आयकर विभागाने हिंदुस्थानातील सर्व पॅनकार्डांना आधारशी जोडण्याची शेवटची तारीख म्हणून 30 जून निश्चित केली आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने दहाव्यांदा मुदतवाढ दिली होती. म्हणून आपणही अद्याप आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर ते 30 जूनपूर्वी करा.
आधार आणि पॅन म्हणजे नेमके काय?
आधार म्हणजे युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने जारी केलेले बायोमेट्रिक प्रमाणीकरण तर पॅन म्हणजे आयकर विभागाने जारी केलेला 10 आकडी क्रमांक. विविध आस्थापनांमध्ये ओळखपत्र म्हणून तसेच आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्डावरचा क्रमांक ग्राह्य धरला जातो.
आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला नाही तर?
आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेला नाही तर तुमचे पॅनकार्ड अवैध मानले जाईल. बँकेतील व्यवहारांसाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठीही पॅनकार्ड लागते. त्यामुळे तुमच्या बँकेतील सर्व व्यवहार ठप्प होण्याची भीती.
पॅनकार्डशी असा जोडा आधार क्रमांक
- वेबसाइटवर तुमचे खाते उघडा.
- तुमचे प्रोफाईल तयार करा.
- त्यानंतर आधार लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
- अर्जात पॅनकार्डवर दाखवल्याप्रमाणे तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी माहिती भरा.
- पुढे तुमचा आधार क्रमांक आणि नाव भरा.
- त्यानंतर लगेचच तुमचा आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेल्याचा खात्रीलायक मेसेज ई-मेलद्वारे तुम्हाला येईल.
- आधारकार्ड सक्तीचे
- मोबाईल क्रमांक आधारकार्डशी जोडणेही बंधनकारक.
- विविध सरकारी सेवांसाठी आधारकार्ड सक्तीचे.
- मोबाईल क्रमांकही सुरू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे.


























































