
बंगळूरूत आयएएस अधिकारी बीएम विजय शंकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्नाटकच्या IMA Ponzy घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले होते. त्यांना अटकही झाली होती आणि त्यांना निलंबीत करण्यात आले होते.
#Bengaluru
Suspended IAS officer involved in #IMA ponji scam B M Vijay Shankar the then DC of Bengaluru has committed suicide at his residence in Jayanagar.
He was arrested by SIT last year for allegedly accepting 1.5 crore bribe to give clean chit to IMA company.@indiatvnews pic.twitter.com/HFNPFjLlLk— T Raghavan (@NewsRaghav) June 23, 2020
कर्नाटकात गेल्या वर्षी IMA Ponzy घोटाळा झाला होता. या घोटाळ्यातून कंपनीला क्लीन चीट देण्यासाठी विजय शंकर यांनी दीड कोटींची लाच घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यंना अटकही केली होती. नंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती. विजय शंकर यांना अटक झाल्यानंतर निलंबीत करण्यात आले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
























































