बीडला दिलासा; तिसऱ्या दिवशीही कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

बीडमध्ये कोरोना फैलावण्याचा भिती व्यक्त होत असतानाच जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य खात्याने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांचे वाढणारे मीटर थांबले आहे. सलग तिसऱ्या दिवशी बीडवासीयांना दिलासा मिळाला असून 11 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.

बीड जिल्ह्यात सकाळी 11 जनाचे सॅम्पल तपासणीसाठी अंबाजोगाईला पाठवण्यात आले होते. त्या 11 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी अहवाल निगेटिव्ह आल्याने शहर वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसात 100 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनाचे मीटर स्टॉप झाले आहे. सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात 23 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही, ही जमेची बाजू आहे. बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगण्यात आले.