संतापजनक! बकरीला कुत्रा चावला म्हणून 40 कुत्र्यांना विष घालून ठार मारलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी केरळ येथील गर्भवती हत्तिणीला फटक्यांनी भरलेलं अननस खायला घातल्याचं प्रकरण उघड झालं होतं. त्या घटनेमुळे सर्वत्र संतापाचं वातावरण होतं. आता तसाच संतापजनक प्रकार ओडिशातील कटक येथे घडला आहे. येथील एका गावातल्या 40 कुत्र्यांना विष घालून ठार मारण्यात आलं आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तपत्रानुसार, ओडिशा येथील कटक जिल्ह्यात ब्रह्मानंद मलिक नावाचा माणूस राहतो. त्याने घरात काही बकऱ्या पाळल्या होत्या. एक दिवशी एका बकरीला पिसाळलेला कुत्रा चावला. या घटनेमुळे मलिक खूप संतापला. त्याने भरत मलिक नावाच्या तरुणासोबत एक भयंकर योजना आखली.

त्याने मांसाचे तुकडे खरेदी केले आणि त्यात विष मिसळून ते गावातील अनेक कुत्र्यांना खाऊ घातलं. विषारी मांस सेवन केल्याने 40 कुत्रे तडफडून गतप्राण झाले. या घटनेनंतर गावात एकच गहजब उडाला. या प्रकरणी या दोघांविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर अटकेच्या भीतीने हे दोघे गावातून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.