मेहकर तालुक्यात वीज पडून बालिका ठार, दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यात आज दुपारी जनुना शिवारात वीज पडून अकरा वर्षीय बालिका ठार तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. आज दुपारी अंदाजे साडेतीन चे दरम्यान जनुना शिवारात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यावेळी शेतात असलेल्या सुनंदा राठोड (वय 55), रेखा चव्हाण (वय 35) व अनोखी राठोड (वय 11) यांनी जीव वाचवण्यासाठी शेतातील झोपडीचा आधार घेतला. मात्र याच परिसरात वीज पडल्याने अनोखी हिचा मृत्यू झाला तर सुनंदा राठोड व रेखा चव्हाण या जखमी झाल्या. त्यांना मेहकर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बुलढाणा पाठवले आहे. मयत अनोखी ही आपल्या आत्या कडे पाहुणी म्हणून आली होती. ती गावंडगाव अकोला येथील रहिवासी आहे.