जगात कोरोना रुग्णांचा आकडा एक कोटीच्या पार, पाच लाखहून अधिक रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. जगात कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीहून अधिक झाली असून पाच लाखहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. www.worldometers.info या वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार जगात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 89 हजार 983 झाली आहे. तर आतापर्यंत  54 लाख 66 हजार 998 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 5 लाख 1 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसे जगात सध्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 41 लाख 21 हजार 716 आहे. यापैकी एक टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

अमेरिकेत परिस्थिती बिघडलेलीच

अमेरिकेत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेत आतापर्यंत 25 लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत एकाच दिवशी तब्बल 40 हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशात दोन राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. टेक्सासमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तर फ्लोरिडामध्ये दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.