कोल्हापुरात नवजात बालकाचे अनोखे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुटुंबात बाळ जन्माला आल्याच्या आनंदात रोहित बापु कांबळे व त्यांच्या कुटुंबियांनी वडणगे येथील शिवपार्वती पार्क येथे राहत्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची शंभर झाडे लावून नवजात बालकाचे स्वागत केले. बाळाच्या अशाप्रकारच्या स्वागताचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करवीर पंचायत समितीचे सदस्य इंद्रजीत पाटील यांच्या हस्ते सोनचाफ्याचे झाड लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाळाचे अशा प्रकारे झाडे लावून स्वागत करणे ही संकल्पना खूपच विधायक व आदर्शवत आहे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच कॉलनीमधील एकोपा वृध्दींगत होऊन विविध विकासात्मक कामांना प्रोत्साहन मिळत राहिल, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कॉलनीत प्लॅस्टीकचा वापर टाळण्याचे उपस्थित सर्वांना आवाहन करुन, उपस्थित सर्वांनी शिवपार्वती पार्क प्लॅस्टीकमुक्त करण्याचा निश्चय केला.