उच्च शिक्षणासाठी ऑनलाइन पर्याय स्वीकारा! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल माध्यमातून ऑनलाइनचा पर्याय स्वीकारावा. आयआयटी सारख्या संस्थांनी देखील ऑनलाइन शिक्षण द्यावे, मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का हे देखील पाहावे, असे मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे क्यक्त केले.

अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने’ या विषयाकरील चर्चासत्राचे (वेबिनार) राजभवन येथून उदघाटन करताना

तंत्रज्ञानाचा कापर करून परीक्षा घ्या!

परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वतःला खचितच समाधान लाभणार नाही असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे. लहान मुलांच्या नेत्र आरोग्याचा विचार करून लहान्यांच्या अध्यापनासाठी ऑनलाइन साधने खरोखरीच उपयुक्त आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही मत राज्यपालांनी व्यक्त केले.