संजय कुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. सेवानिवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून पदभार स्वीकारला. कोरोना नियंत्रणाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणार असे संजय कुमार यावेळी म्हणाले.

चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाचा राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळ्यात रोगराईचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यावेळी सांगितले.