केंद्राकडून राज्याला एक पैसाही नाही, दोन लाख कोटींच्या पॅकेजची फेकमफाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात राज्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत दोन लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, पण प्रत्यक्षात राज्याच्या तिजोरीत एक पैसाही जमा केला नसल्याची बाब उघड झाली आहे.

केंद्राने निधी दिला, पण त्यातही चलाखी केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना, वृद्ध निराधार योजना, अन्नधान्य याचा निधी पॅकेजचा भाग असल्याचे पेंद्र सरकारने दाखवले आहे. खरे तर ही नियमित मदत आहे, असे अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

या पॅकेजअंतर्गत प्रत्यक्षात केंद्राकडून फार कमी पैसे येणार आहेत. या मदतीसाठी बँकांकडून कर्ज घ्या. बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्यावरील व्याजाचा काही भाग केंद्र सरकार भरेल. कर्ज काढले तर व्याजदर कमी करू, कर्जाची रक्कम भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देऊ अशा अटी घातल्या होत्या. पण केंद्राकडून थेट पैसे आले नाहीत असे या अधिकाऱयाने स्पष्ट केले.