मोदी सरकार सार्वजनिक उपक्रम आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहे, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balasaheb-thorat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही नवा उपक्रम उभारला नाही. उलट लाखो लोकांना रोजगार देणारे सार्वजनिक उपक्रम मोदी सरकार आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालत असल्याचा आरोप कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

रेल्वेच्या खासगीकरणाच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या असून त्याकरून काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप सरकारने त्यांच्या काळात एकही सार्वजनिक उपक्रम निर्माण केला नाही. आता मात्र खासगीकरणाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले व लाखो लोकांना रोजगार देणारे जनतेच्या मालकीचे सार्वजनिक उपक्रम उद्योगपती मित्रांच्या घशात घालण्यात येत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भात थेट पंतप्रधान मोदींनाच ट्विटरवर टॅग करून थोरात यांनी आपला विरोध दर्शविला आहे.

जनता याचे ठोस उत्तर देईल – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत रेल्वे खासगीकरणाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. रेल्वे ही गरीबांची एकमेव जीवनरेषा आहे आणि सरकार त्यांच्यापासून ती हिरावून घेत आहे. जे हिरावून घ्यायचे आहे ते घ्या, मात्र हे लक्षात ठेवा देशाची जनता याचे ठोस उत्तर देईल, असे त्यांनी बजावले आहे