Mumbai Rain हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, मुंबईत मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणासह मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी ( 3 आणि 4 जुलैला) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. पावसाने हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरवत शुक्रवारी व्यवस्थित हजेरी लावली.

निसर्ग वादळाच्या वेळी आलेला पाऊस वगळता जून महिन्यात मुंबईत फारसा पाऊस पडला नव्हत, मात्र जुलै महिना सुरू होताच पावसाने आपले रंग बदलायला सुरुवात केली. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाऊस अधून-मधून बरसायला लागला होता.

हवामान खात्याने या आधीही मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेनेही हवामान विभागाचा हवाला देत मुंबईत दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले होते.