शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखांची व्यवसाय बुडालेल्या दिव्यांगांस आर्थिक मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटाने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गावागावात सायकलवर फिरून व्यवसाय करणारे वरठी गावातील अंध असलेले अमरदिप जुनघरे यांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यांच्या समोर कुटुंबाचे पालन कसे करावे, असा प्रश्न निर्माण  झाला असताना शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख जयदीप रोडे यांनी वाढदिवसानिमित्त पिडीत दिव्यांग जुनघरे यांना दहा हजाराची मदत करून त्यांच्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्याचे काम केले.

चंद्रपूर शहराजवळील कवठी गावातील दिव्यांग अमरदिप जुनघरे हा दहा वर्षांपासून दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. घरची परिस्थिती आधीच हलाखीची होती. सदस्यांची सर्व जबाबदारी दिव्यांग अमरदिप वर आली. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वात जास्त धक्का अमरदिपला बसला. त्याचा व्यवसाय बंद पडला. पत्नीचा झेरॉक्स मशीनचा व्यवसाय देखील बंद पडला. त्यामुळे त्याच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अमरदिपला नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली. त्याने अनेक ठिकाणी पैशाची मदत मागितली पण त्याला कुठूनच मदत मिळाली नाही. याबाबत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख जयदीप रोडे यांना माहिती मिळाली असता त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता अमरदिपला व्यवसाय सुरु करण्यासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.