सीआयएसएफचे जवान करणार प्लाझ्मा दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर

मुंबई विमानतळाकर सुरक्षेसाठी असणाऱया केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी कोरोनावर मात केली आहे, असे जवान आता प्लाझ्मा दान करणार आहेत. प्लाझ्मा दान करणाऱया ऐच्छिक जवानांची यादी काढण्याचे काम सुरू आहे.

केंद्रीय गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱया सीआयएसएफच्या जवानांना अति महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केले जाते. मुंबईत विलेपार्ले आणि सहार विमानतळावर सुमारे साडेचार हजार जवान आणि अधिकारी हे कर्तव्यास आहेत. लॉक डाऊन काळात परदेशातून मुंबईत विमानाने आलेल्या नागिरकांची थर्मामीटरने तपासणी करण्याचे काम सीआयएसएफच्या जवानांनी केले. हाय रिस्क झोन मध्ये काम केल्याने 90 जणांना (अधिकारी, कर्मचारी) कोरोनाची लागण झाली. त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून दिले. परिणामी 78 जणांनी कोरोनावकर मात केली असून सध्या 12 जण उपचार घेत आहेत. ज्या जवानांनी कोरोनावर मात केली आहे, असे जवान आता प्लाझ्मा दान करणार आहेत. ऐच्छिक प्लाझ्मा दान करणाऱया जवानांची यादी काढण्याचे काम सुरु असल्याचे सीआयएसएफचे उप महानिरीक्षक के. एन. त्रिपाठी यांनी सांगितले.

– नुकतीच दिल्ली विमानतळाकर कार्यरत असणाऱया दोन जवानांनी कोरोनावर मात केली होती. त्या दोघांनी दिल्लीतील खासगी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान केले होते.