घरगुती ग्राहकांची 300 युनिटपर्यंतची वीज बिले सरकारने भरावीत, वीज ग्राहक संघटनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यातच महावितरणने तीन महिन्यांचे एकत्रित पाठविलेले वीज बिल ग्राहकांना डोईजड झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुटुंबप्रमुख म्हणून लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल भरावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे. तसेच महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या वाढिव वीज बिलाच्या निषेधार्थ सोमवार, 13 जुलै रोजी राज्यभर वीज बिलांची होळी करण्याचा इशारा दिला आहे.

सध्या सर्व सामान्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाकितरणने पाठकलेली वाढिव विजबिले भरायची कशी असा प्रश्न उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहक संघटनेची आज बैठक झाली. यामध्ये राज्य सरकारने 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीज बिलाचा भार सरकारने उचलावा अशी मागणी सर्वांनी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी सांगितले. तसेच सर्वपक्षीयांच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील आणि महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.