
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागांची पुनर्लागवड करण्यात येणार आहे. कोकणातील वादळग्रस्त भागातील फळबागांच्या पुनर्लागवडीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास आज नियोजन विभागाने मान्यता दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळात कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील आंबा, काजू, नारळ, सुपारी या बागांचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात वादळामुळे बागायतदारांचे उत्पन्नाचे स्त्रोत नष्ट झाले आहे. अशा शेतकऱयांना फळबागांच्या पुनर्लागवडीसाठी झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून शासकीय अनुदान देणे गरजेचे होते. जून महिन्यात झालेल्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

























































