
रायगडावरील हत्ती तलाव पाण्याने भरला आहे. सुमारे दीडशे वर्षानंतर तो पुर्ण भरल्याचे सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरण’ च्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. असे क्षण जीवनात खूप कमी येतात, ज्याचे समाधान आयुष्यभर लाभते, असे संभाजीराजे यांनी या घटनेबाबत सांगितले. रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले आहे. तलावाला अजूनही एक जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून ती बंद केली जाईल, असे त्यांनी सांगितले.






























































