बुलढाणा – आता ग्रामीण भागातही लॉकडाऊनचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा बुलढाणा जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिंदखेडराजा तालुक्यात कोरोना संसर्गाची साखळी तुटावी हा उद्देश समोर ठेवत शुक्रवारी झालेल्या तालुकास्तरीय सभेत ऊपविभागिय अधिकारी महसुल प्रशासन यांनी एक निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार दिनांक 11 जुलै ते 13 जुलै शनिवार, रविवार व सोमवार हे तीन दिवस संपुर्ण सिंदखेडराजा तालुका शहरासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडीकल व दवाखाना वगळता सर्व दुकाने/ व्यापारी प्रतिष्ठाने सिंदखेडराजा शहरासह ग्रामीण भागात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या काळात गावातील कोणत्याही व्यक्ती ने गावाच्या बाहेर जाऊ नये. आपल्या गावात जे भाजीपालासह इतर दुकानदारांनासुद्धा बाहेर गावात जाऊ देऊ नये. सिंदखेडराजा शहर 100% बंद असल्याने गावातील दवाखान्याच्या कामाव्यतिरीक्त कोणीही तालुक्याच्या ठिकाणी येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. गावातील प्रत्येक नागरिकांनी घेऊन कोरोना संसर्गाचा धोका आपल्या गावात होऊ नये यासाठी सतर्क राहुन निर्णयाची अमंलबजावणी करावी. आपल्या गावातील जनतेच्या जिवापेक्षा काहीही मोठे नाही, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.