Breaking News – अखेर प्रतिक्षा संपली, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (16 जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल  मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. हा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल

www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

img-20200715-wa0014