
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल गुरुवारी 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. निकालात मुलींनीच बाजी मारली असून 93.88 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के लागला आहे. तर संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.18 टक्के इतका लागला आहे. कोकण, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर या विभागांचे निकाल 90 टक्क्याहून अधिक लागले आहेत. तर लातूर, मुंबई, नाशिक, संभाजीनगर विभागांचे निकाल 90 टक्क्यांपेक्षा कमी लागले आहेत.

येथे पाहा निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
maharashtraeducation.com



























































