धाराशिव जिल्ह्यात 16 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची वाढ, एकूण रुग्ण 486

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यात शुक्रवार, 17 जुलै रोजी 10 वाजता आलेल्या रिपोर्टनुसार एकूण 16 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 24 तासात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार, 16 जुलै रोजी सायंकाळी उशिरा, रॅपिड अँटीजेन किट्सच्या माध्यमातून शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर मधील 48 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पॉझिटीव्ह रुग्णामध्ये धाराशिव शहरातील महादेव गल्ली, खडकपुरा, जेल निवासस्थान येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तसेच 16 जुलै रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून 124 स्वॅब नमुने तपासणी साठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. यामध्ये 13 पॉझिटीव्ह, 5 अनिर्णित तर 106 निगेटीव्ह आहेत. यामधील धाराशिव तालुक्यातील 3 पॉझिटीव्ह रुग्ण असून यामध्ये धाराशिव शहरातील रामनगर, खाजनगर व तालुक्यातील टाकळी (सुंभा) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तुळजापूर शहरातील एस. टी. कॉलनी कॉलनीतील महिला आहे. उमरगा तालुका 9 तालुक्यातील नऊ रुग्ण असून यामध्ये हमीदनगर येथील आठ तर विश्वेकर हॉस्पिटल येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात एकूण 16 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. काल रात्री तुळजापूर येथील एका 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास पुर्वीपासूनच मधुमेह व उच्च रक्तदाब याचा त्रास होता. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीताचा आकडा 486 झाला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.