निसर्ग चक्रीवादळाचे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना आतापर्यंत 490 कोटी रुपयांचा मदतनिधी वितरीत करण्यात आला आहे. हे नुकसानभरपाई देण्याचे काम समाधानकारकरीत्या सुरू आहे. तेव्हा उर्वरित मदतीचे वाटपही लवकरात लवकर पूर्ण करा. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना मोठय़ा प्रमाणात मदत देण्यात आली असून अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच आहे. कोकणात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते, वीजपुरवठा, मोबाईल कनेक्टिव्हिटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी यामधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी बैठकीस मुख्य सचिव संजय पुमार , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषपुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

490 कोटींचा निधी वितरीत
– रायगड जिल्हय़ासाठी 372 कोटी 97 लाख 16 हजार
– रत्नागिरीसाठी 116 कोटी 78 लाख 69 हजार
– सिंधुदुर्गसाठी 37.19 लाख असा एपूण 490 कोटी 13 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.