बकरी ईदला सार्वजनिक ठिकाणी नमाज नको! गृहमंत्र्यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा बकरी ईदची नमाज मशिद- ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता घरातच अदा करावी असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. यंदा बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या असलेले जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

  • कंटेनमेंट क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहणार आहेत.
  • त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये असे या सुचनांमध्ये म्हटले आहे.