अमरनाथ यात्रा उधळण्याचे षड्यंत्र, कश्मीरमध्ये 24 तासांत सात अतिरेक्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत सात अतिरेक्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. 21 जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा या अतिरेक्यांच्या निशाण्यावर होती अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण खोऱयात हायऍलर्ट जारी करण्यात आला आहे.

यंदा 21 जुलैपासून अमरनाथ यात्रेचा प्रारंभ होणार असून ती 3 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण कश्मीर खोऱयात लष्कराच्या वतीने अतिरेक्यांच्या किरोधात ऑपरेशन ऑलआऊट राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 150 पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात जैश ए मोहमंद, लश्कर ए तोयबा तसेच हिजबूल मुजाहिदीन या संघटनांचे कंबरडेच मोडले. त्यामुळे बिथरलेल्या अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रा उधळून लावण्याची धमकी दिली होती.

शोपियां जिल्ह्यात अमशीपुरा येथे काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन सुरू केले. सुरक्षा पथकांनी घेरल्याचे पाहून अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. जकानांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. अनेक तासांच्या चकमकीनंतर चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ठार झालेले सर्व अतिरेकी जैश ए मोहंमदचे असून या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक दिलबागसिंह यांनी दिली.

खात्मा झालेल्यांमध्ये जैशचा बॉम्ब एक्स्पर्ट
शनिवारी खात्मा झालेल्या अतिरेक्यांमध्ये जैशचा कमांडर कालिदचा समावेश आहे. वालिद हा आयईडी बॉम्ब बनवण्यात अतिशय निष्णात होता असे कश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले. घटनास्थळाकरून एम4 रायफल, एके47 रायफलींसह एक पिस्तूल जप्त करण्यात आले.

कुलगाममध्ये तीन अतिरेकी ठार
शुक्रवारी कुलगामच्या नगनाद परिसरात अतिरेकी आश्रयाला आल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने कोम्बिग ऑपरेशन सुरू केले. अतिरेक्यांनी गोळीबार करताच जवानांनी जोरदार पलटवार केला. यात जैश ए मोहमंदचे तीन अतिरेकी ठार झाले.